
US Gold Reserve Fort Knox: अमेरिकेचे हजारो टन सोने खरोखर सुरक्षित आहे का, की केवळ अफवा आहे, असा प्रश्न ट्रम्प यांचे समर्थक सातत्याने उपस्थित करत आहेत. आता हे रहस्य उलगडण्यासाठी इलॉन मस्क स्वतः पुढे येऊ शकतात. विशेष म्हणजे 1974 पासून ही तिजोरी सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद असून केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि पत्रकारांनाच तो पाहायला मिळत होता.