Anand Mahindra: या शहरात रस्ते नाहीत तर.. आनंद महिंद्रांनी दाखवली मॉडर्न शहराची झलक, व्हिडिओ व्हायरल

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Anand Mahindra
Anand MahindraSakal

Anand Mahindra: महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे भारतातील मोठे उद्योगपती आहेत जे सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असतात. दररोज ते काहीतरी मजेदार, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी पोस्ट शेअर करत राहतात, ज्या व्हायरल होतात. यावेळीही त्यांनी ट्विटरवर (आता X) अशीच काही पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आहे.

त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये, आनंद महिंद्रा यांनी सौदी अरेबियातील निओम शहराचे सीईओ नधमी अल-नासर यांचे भविष्यातील शहराच्या प्लॅनचे कौतुक केले आहे.

नधमी अल नसर यांना त्यांनी प्रेमाने ‘नो-नॉनसेन्स नधमी’ म्हणून संबोधले आहे आणि त्यांनी तयार केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची झलकही शेअर केली आहे.

त्यांच्या पोस्टमध्ये, आनंद महिंद्रा यांनी, हा प्रकल्प "जॉर्ज लुकासच्या स्वप्नातील" असल्यासारखे वाटते. नधमी अल-नासर यांना भेटल्यानंतर शहराबद्दलचे त्यांचे मत बदलले आहे. असे त्यांनी सांगितले.

“प्रोजेक्ट @NEOM, सौदी अरेबियाच्या HRH मोहम्मद बिन सलमान यांची कल्पना आहे, बहुतेकांना ती केवळ कल्पनाच वाटत होती. जॉर्ज लुकासच्या स्वप्नातील असल्यासारखी.

पण NEOM चे सीईओ नधमी अल-नासर यांना भेटल्यानंतर मला जाणवले की त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट तो लवकरच पूर्ण होऊ शकेल," असे आनंद महिंद्रा यांनी X वर पोस्ट केली आहे.

Anand Mahindra
Aditya Birla Group: आदित्य बिर्ला ग्रुपची पेंट व्यवसायात एंन्ट्री होताच गुंतवणूकदार झाले मालामाल

हे शहर कोठे असेल?

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या x पोस्टमध्ये ज्या शहराबद्दल सांगितले आहे ते सौदी अरेबियामध्ये बनवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे शहर ताबूक राज्यात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जात आहे. या शहराला निओम सिटी असे नाव देण्यात आले आहे. हे शहर 2026 पर्यंत तयार होईल, असा दावा केला जात आहे.

निओम सिटीची वैशिष्ट्ये

या शहरात रस्ते किंवा गाड्या असणार नाहीत असे सांगण्यात येत आहे. या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हायस्पीड गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. हे शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालेल आणि शून्य कार्बन शहर असेल. म्हणजे इथे अजिबात प्रदूषण होणार नाही.

Anand Mahindra
Success Story: व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा फेमस आहे 'पटेल ब्रँड'! कोण आहेत भारतीय वाईन किंग?

सौदी अरेबियाला डोंगराळ वाळवंटात 170 किमी लांबीचे अल्ट्रा आधुनिक शहर बनवायचे आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2017 मध्ये याची घोषणा केली होती. हे शहर बेल्जियमइतके मोठे असेल.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला बातमी लिहिपर्यंत 58 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि यूजर्सनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचे x वर करोडो फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com