'हा' मल्टीबॅगर पॉवर स्टॉक विक्रमी उच्चांकावर...

अपार इंडस्ट्रीजचा हा मल्टीबॅगर स्टॉक एका वर्षात 209% आणि दोन वर्षात 1298% वाढला आहे.
Apar Industries multibagger power stock at a record high share market
Apar Industries multibagger power stock at a record high share marketSakal

इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अपार इंडस्ट्रीजच्या (Apar Industries) शेअर्सने नुकताच विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी चौथ्या तिमाहीची आणि पूर्ण वर्षाची कमाई जाहीर केल्यानंतर ही वाढ दिसून आली. अपार इंडस्ट्रीजचा शेअर सध्या बीएसईवर 8398.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याची मागील बंद किंमत 7733.45 रुपये होती.

अपार इंडस्ट्रीजचा हा मल्टीबॅगर स्टॉक एका वर्षात 209% आणि दोन वर्षात 1298% वाढला आहे. कंपनीच्या 22.37 कोटीच्या एकूण 0.28 लाख शेअर्सची शेवटच्या व्यवहारात खरेदी-विक्री झाली. कंपनीचे मार्केट कॅप 33,298 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी 19 मे 2023 रोजी हा शेअर 2650 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

कंपनीचा चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 3% ने घसरून 236.22 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 242.74 कोटी होता. त्याच वेळी, महसूल 9% वाढून 4455 कोटीवर पोहोचला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 4084 कोटी होता. कंपनीचा एबिटदाही 3% ने वाढून 457 कोटी झाला आहे. पण, गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत प्रति शेअर कमाई (ईपीएस) 63.43 रुपयांवरून 60.97 रुपयांवर घसरली.

कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 13% टक्क्यांच्या वाढीसह 16,153 कोटीचा विक्रमी महसूल मिळवला. त्याच वेळी, संपूर्ण वर्षासाठी निव्वळ नफा 29% वाढून 825.11 कोटी झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 51 रुपये लाभांश जाहीर केला आहे. अपार इंडस्ट्रीजचे शेअर्सचे आरएसआय 59 वर आहे, जे हे संकेत देत आहेत की शेअर्स ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये नाहीत. कंपनीच्या शेअर्सचा बीटा 0.7 आहे, जो एका वर्षातील सरासरी अस्थिरता दर्शवत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com