China vs America: चीनचा अमेरिकेला दणका! बंदीची बातमी येताच Apple चे 16.61 लाख कोटींचे नुकसान, काय आहे प्रकरण?

China Ban iPhone: चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा फटका आता कंपन्यांना सहन करावा लागत आहे.
Apple shares fall after reports that China banned iPhone use by government employees
Apple shares fall after reports that China banned iPhone use by government employeesSakal

China Ban iPhone: चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा फटका आता कंपन्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत आयफोन बनवणारी दिग्गज अमेरिकन कंपनी अॅपलला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हे प्रकरण आयफोनशी संबंधित आहे. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की चीनी सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण त्याचा परिणाम अॅपलच्या शेअर्सवर दिसून आला आहे.

चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आयफोन वापरण्यावर बंदी घातल्याची बातमी मंगळवारी समोर आली. त्यानंतर बुधवारी अॅपलचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर गुरुवारीही शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या दोन दिवसांच्या घसरणीमुळे Apple चे मार्केट कॅप सुमारे 20 हजार कोटी डॉलर (म्हणजे 16.61 लाख कोटी रुपये) कमी झाले.

Apple shares fall after reports that China banned iPhone use by government employees
RBI On I-CRR: RBI चा बँकांना मोठा दिलासा, I-CRR मागे घेण्याची केली घोषणा, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

आयफोन बंदीचा निर्णय का घेतला?

गुरुवारी ऍपल स्टॉक Nasdaq वर घसरला आणि 177.56 डॉलर वर बंद झाला. 5 सप्टेंबर रोजी त्याची किंमत 189.7 डॉलर होती. सध्या Apple चे मार्केट कॅप 2.80 ट्रिलियन डॉलर आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आयफोन बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पण वृत्तानुसार अधिकाऱ्यांना आयफोन घेऊन कार्यालयात न येण्याचे आणि कार्यालयात अधिकृत काम करण्यासाठी आयफोनचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Apple shares fall after reports that China banned iPhone use by government employees
Demat Account: गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे, ऑगस्ट महिन्यात इतक्या नव्या डी-मॅट खात्यांची झाली नोंद

मात्र, ही बंदी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे की, काही कार्यालयांसाठीच आहे. हे अद्याप समजू शकलेले नाही. चीनमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोन ठेवण्यास बंदी घातली, तर त्याची विक्री सुमारे 5 टक्क्यांनी घटू शकते, अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे आयफोन बनवणारी कंपनी अमेरिकन आहे. पण या कंपनीसाठी चीन ही मोठी बाजारपेठ आहे. एका अहवालानुसार, चीन, हाँगकाँग आणि तैवान ही जगातील अॅपलसाठी तिसरी मोठी बाजारपेठ आहे. अॅपलचा चीनमध्ये मोठा व्यवसाय आहे.

चीनने सध्या सरकारी अधिकाऱ्यांना आयफोन वापरण्यावर बंदी घातली आहे, तर येत्या काही दिवसांत सरकार हा आदेश जनतेसाठी जारी करू शकते. लोकांनी आयफोन ऐवजी चायनीज फोन वापरावेत. त्यामुळे चिनी कंपन्यांना फायदा होईल. असा सरकारचा हेतू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com