Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 7.32 टक्क्यांनी वाढून 104.42 कोटी झाला आहे.
Arvind Limited Shares Earn Rooftop Earnings For Investors 200 percent Rise In One Year
Arvind Limited Shares Earn Rooftop Earnings For Investors 200 percent Rise In One YearSakal

अरविंद लिमिटेडचे (Arvind Limited) शेअर्स त्यांच्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा मिळवून देत आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 7.32 टक्क्यांनी वाढून 104.42 कोटी झाला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीचा निव्वळ नफा 97.3 कोटी होता. त्याच वेळी गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि केवळ एका वर्षात, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 200% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

कंपनीचा तिमाहीत ऑपरेशनल इनकम 2,074.51 कोटी होता, तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत तो 1,880.76 कोटी होता अशी माहिती अरविंद लिमिटेड कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिली.

कंपनीच्या संचालक मंडळाने मार्चअखेरच्या आर्थिक वर्षासाठी 3.75 प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 1 प्रति शेअर एकरकमी विशेष लाभांशाची शिफारस केली आहे. यासाठी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सची मंजुरी आवश्यक असेल.

2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 352.63 कोटी होता जो 2022-23 या आर्थिक वर्षात 413.17 कोटी होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑपरेशनल इनकम 7,737.75 कोटी होते, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 8,382.48 कोटी होते.

सोमवारी 6 मे रोजी शेअरची किंमत सुमारे 332 रुपये होती. तर एनएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 340 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 105 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 11% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 62% परतावा दिला आहे. यासोबतच, गेल्या एका वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 200% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com