Mutual Fund : म्युच्युअल फंड दुपटीने वाढणार ; मालमत्ता १०० लाख कोटींवर जाण्याची अपेक्षा

देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबर २०२३ मध्ये ५० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर गेली असून, वर्ष २०३० अखेर ती दुपटीने वाढून १०० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज ‘ॲक्सिस कॅपिटल’ने वर्तविला आहे.
Mutual Fund
Mutual Fundsakal

नवी दिल्ली : देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबर २०२३ मध्ये ५० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर गेली असून, वर्ष २०३० अखेर ती दुपटीने वाढून १०० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज ‘ॲक्सिस कॅपिटल’ने वर्तविला आहे. ‘द इंडिया ॲसेट मॅनेजमेंट एयूएम ऑन डबल’ हा अहवाल कंपनीने आज जाहीर केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता वर्ष २०३० पर्यंत म्हणजे आगामी सात वर्षांत दुपटीने वाढून १०० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वार्षिक १४ टक्के चक्रवाढ दराने त्यात वाढ होईल. म्युच्युअल फंड उद्योगाने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा ५० लाख कोटी रुपयांचा टप्पा २५ लाख कोटी रुपयांवरून चार वर्षांत गाठला आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची व्याप्ती वेगाने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०३० पर्यंत घरगुती बचतही याच वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाचा देशातील ‘जीडीपी’तील हिस्सा फक्त १५ टक्के आहे. जागतिक सरासरी ७४ टक्के असून, त्या तुलनेत भारतातील प्रमाण खूप कमी आहे. म्युच्युअल फंडांमध्ये ४.२ कोटी गुंतवणूकदार असून, काम करण्याच्या वयोगटातील लोकांच्या एकूण संख्येपैकी केवळ पाच टक्के लोकांचा यात समावेश आहे. गुंतवणुकीच्या रकमेचे प्रमाणही कमी आहे. ‘एसआयपी’द्वारे सरासरी २३०० रुपयांची गुंतवणूक केली जाते. त्यामुळे या क्षेत्रात वाढीसाठी प्रचंड संधी आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या उद्योगातील मोठ्या कंपन्यांना वर्चस्व कायम राखण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या मजबूत फ्रँचायझी जाळ्यामुळे त्यांना ते शक्य होईल. सध्या आठ मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या या उद्योगातील सुमारे ७३ टक्के मालमत्तेचे व्यवस्थापन करतात, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Mutual Fund
Mutual Fund : उसळत्या बाजारात, ओळखा पुढची बात!

‘एसआयपी’मुळे वाढीला चालना

म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीत ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीचा मोलाचा वाटा आहे. ‘एसआयपी’द्वारे दरमहा होणारी गुंतवणूक १८ हजार ८०० कोटींवर गेली असून, वर्षाला दोन लाख २५ हजार कोटी रुपये गुंतवले जातात. छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग आर्थिक वर्ष २०१६ मधील ४५ टक्क्यांवरून आता ६० टक्क्यांवर गेला आहे. डिजिटायझेशनने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com