
नंदिनी वैद्य - ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी, २१ जून रोजी साजरा झाला. यानिमित्त मर्यादित अर्थाने योगासने आणि गुंतवणूक यातील परस्परसंबंध आपण बघणार आहोत. संतुलन, लवचीकता, सरलता, सहजता, चिवटपणा, संयम, दीर्घकाळ, सातत्य, सावध, डोळस पद्धतीने प्रयत्न ही योगाची वैशिष्ट्ये आहेत. त्याने दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. योगासनाची ही वैशिष्ट्ये गुंतवणुकीबाबतही अवलंबली, तर आर्थिक स्वास्थही सुधारते.