सतर्क नागरिकांचे डिजिटल ‘चक्षू’

सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन याचा सामना करण्यासाठी सजग नागरिकांनाच तपास यंत्रणेशी जोडून ही यंत्रणा अधिक भक्कम करण्याचे अभिनव पाऊल सरकारने उचलले आहे.
cyber watch
cyber watchsakal

- अमित रेठरेकर, क्वॉलिफाइड कंपनी सेक्रेटरी

आजकाल अनेक नागरिकांना दररोज ‘केवायसी’ची मुदत संपली किंवा बँकेचे खाते अद्ययावत करणे, गॅसजोडणी, वीजजोडणी, गुगलवर लाईकसाठी कॉल, व्हॉट्सअॅप किंवा ‘एसएमएस’ किंवा बनावट लिंक येत असतात किंवा नोकरीसाठी संपर्क अथवा त्वरित पैसे कमावण्याची संधी असे आमिष दाखविणारे मेसेजदेखील येत असतात. याला बळी पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या आर्थिक फटका बसतो.

सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन याचा सामना करण्यासाठी सजग नागरिकांनाच तपास यंत्रणेशी जोडून ही यंत्रणा अधिक भक्कम करण्याचे अभिनव पाऊल सरकारने उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने संचारसाथी उपक्रमांतर्गत ‘चक्षू’ पोर्टल सुरू केले आहे. यावर नागरिक संशयास्पद फोन नंबरवरून येणारे कॉल किंवा मेसेज याची माहिती देऊ शकतात.

डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म

दरम्यान, दूरसंचार विभागाने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे डिजिटल इंटेलिजेन्स प्लॅटफॉर्म (डीआयपी). कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विविध तपास यंत्रणा, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये फसवणुकीचा सर्वसमावेशकपणे सामना करण्यासाठी सहकार्य वाढविण्याचा याचा उद्देश आहे.

या पोर्टलवर ‘चक्षू’ पोर्टलवर नागरिकांकडून आलेली माहिती आणि सायबर क्राईम पोर्टलमधील त्यासंबंधी जमा असलेली माहिती याचा मेळ घातला जाईल. यामुळे वेळीच असे संशयास्पद मोबाइल क्रमांक, व्यक्ती किंवा संस्था यांचा शोध घेऊन त्यांना आळा घातला जाईल. परिणामी, अनेक संभाव्य बळी आधीच वाचविण्यात यश मिळेल.

आपण सर्व नागरिक सतर्क राहून, संशयास्पद माहिती या ‘चक्षू’ यंत्रणेवर देऊन सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. डिजिटल गुन्हे रोखण्यासाठीच्या केंद्र सरकारच्या या उपक्रमाला नागरिकांनी ‘तिसरा डोळा’ बनून सहकार्य केल्यास अनेकांची फसवणूक टळेल.

ओळख गुप्त राहते

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ https://sancharsaathi.gov.in/sfc/ या संकेतस्थळावर ‘चक्षू’मध्ये नागरिक बोगस मेसेजेस, कॉल याबद्दलची माहिती देऊ शकतात. यासाठी तुमचे नाव, मोबाइल क्रमांक, संशयास्पद वाटलेली माहिती कोणत्या रीतीने (कॉल, व्हॉट्सअॅप किंवा एसएमएस) प्राप्त झाली, तारीख, वेळ आणि ५०० शब्दांपर्यंत मजकूर देता येईल. या प्लॅटफॉर्मवर तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com