
RBI Bank Deposit Insurance Limit: सरकार बँक खात्यांमध्ये ग्राहकांच्या ठेवींवर विमा मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या, ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते. ही मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवता येण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, येत्या सहा महिन्यांत ही मर्यादा वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकार या दिशेने काम करत आहे.