

Bank Holiday Alert: Banks to Remain Closed for 12 Days in May 2026
eSakal
Bank Holidays in May 2026: आजपासून मे महिना सुरू झाला असून आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनामुळे बँकाना सुट्टी असल्याने पुढच्या महिनाभरात आजून किती दिवस बँका बंद राहणार असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. मे महिन्यात देशभरातील बँका तब्बल 12 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे कडक उन्हाचा या दिवसात जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी बँकेत गेला तर आणखीनच निराशा होते. त्यासाठी बँकेतील आपले व्यवहार करण्याआधी एकदा बँका कधी बंद आहेत याची यादी पाहा आणि मगच बँकेत जाण्याचे नियोजन करा.