

Banks to Remain Closed for 14 Days in September , Check 4-Day Long Weekend
eSakal
Banks Closed for 14 Days in September 2026: मंगळवारवासून सप्टेंबर महिना सुरू होत आहे. त्यामुळे या महिन्यात बँकेशी संबंधित कामे असतील, तर बँक शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. सप्टेंबर 2026 मध्ये सण, स्थानिक उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशातील बँका भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या हॉलिडे कॅलेंडरनुसार एकूण 14 दिवस बँक सुट्ट्या असतील.
मात्र या सर्व सुट्ट्या देशभरातली सर्व बँकांच्या शाखांना लागू होणार नाहीत. काही सुट्ट्या केवळ विशिष्ट राज्य किंवा शहरांसाठी आहेत. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपल्या शहरासाठी संबंधित दिवशी सुट्टी आहे की नाही, हे तपासून घ्या.