

Banks Open on Sunday, Closed From Monday! Check the Full Schedule for Next Week
eSakal
Why Are Banks Open on Sunday: रविवार म्हणजे सहसा बँकांना सुट्टी असते. मात्र, यावेळी 27 सप्टेंबरला रविवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू राहणार आहेत. कारण 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असेल, तर सोमवारपर्यंत थांबण्याऐवजी रविवारचा दिवस वापरून ते काम पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरणार आहे.