
TCSच्या कर्मचारी कपातीपासून ते बँक मॅनेजरच्या आत्महत्येपर्यंत अनेक घटना सांगतात की मानसिक ताण वाढत आहे.
BFSI आणि सरकारी बँकांमध्ये कामाचा ताण आणि मनमानी धोरणांमुळे कर्मचारी वैतागले आहेत.
टाटा स्टील, प्रमैरिका यांसारख्या काही कंपन्यांनी मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक पावलं उचलली आहेत.
Work Pressure: टीसीएस कंपनीने अलीकडेच मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. ही घटना केवळ आयटी क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर इतर क्षेत्रांमध्येही अशीच परिस्थिती आहे. आज कामाचा ताण इतका वाढला आहे की डेडलाइन, टार्गेट, जबाबदाऱ्या आणि 'परफॉर्म' करण्याची धडपड याने अनेक जण तणावाखाली जीवन जगत आहेत.