स्मार्ट गुंतवणूक : एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव : रु. १६६०)

विलीनीकरण करारांतर्गत एचडीएफसी बँकेचे शेअर मिळणाऱ्या भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी १३ जुलै ही ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित करण्यात आली.
DFC bank
DFC bankSakal

मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’ आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ वरून १२ जुलै रोजी ‘एचडीएफसी लि.’ म्हणजेच हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीच्या शेअरला निरोप दिला जाणार आहे. त्या दिवसापासून हा शेअर या शेअर बाजारांमधून डीलिस्ट होईल. कारण ‘एचडीएफसी बँक’ आणि ‘एचडीएफसी’ यांचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे.

विलीनीकरण करारांतर्गत एचडीएफसी बँकेचे शेअर मिळणाऱ्या भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी १३ जुलै ही ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित करण्यात आली आहे. विलीनीकरणाच्या अटींनुसार, ‘एचडीएफसी’च्या पात्र भागधारकांना त्यांच्याकडील पूर्वीच्या २५ शेअरमागे एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर मिळतील.

‘निफ्टी-फिफ्टी’ कंपन्यांच्या यादीमध्ये १३ जुलैपासून, ‘एलटीआय माईंडट्री’ ही आयटी क्षेत्रातील कंपनी ‘एचडीएफसी’चे स्थान घेईल; तर ‘बीएसई’वर ‘जेएसडब्ल्यू स्टील’ तिची जागा घेईल.

तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वी एचडीएफसी बँकेने जाहीर केलेल्या पूर्व अंदाजानुसार बँकेच्या अंतर्गत व्यवसाय वर्गीकरणानुसार, ३० जून २०२२ च्या तुलनेत देशांतर्गत किरकोळ कर्जांमध्ये सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे.

व्यावसायिक आणि ग्रामीण बँकिंग कर्जे ३० जून २०२२ च्या तुलनेत सुमारे २९ टक्के वाढली आहेत, तर कॉर्पोरेट आणि इतर घाऊक कर्ज ११ टक्के वाढ दर्शवत आहे. विलीन झालेल्या संस्थेच्या ठेवी ३० जून २०२३ रोजी अंदाजे रु. २०,६३५ अब्ज झाल्या असून, ३० जून २०२२ च्या तुलनेत त्यात सुमारे १६ टक्के वाढ झाली आहे.

या कंपनीने २०१३ पासून शेअरवर सातत्याने १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कर्ज वितरणामध्ये; तसेच ठेवींमध्येदेखील वार्षिक तत्वावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त गतीने वृद्धी केली आहे. आगामी काळात चार ते पाच वर्षांत कंपनीचा व्यवसाय दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. ग्राहक संपादन, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, उत्पादनांचे क्रॉस-सेलिंग व शाश्वत खर्चातील कपात हे सध्या कंपनीसाठी मध्यम कालावधीतील वाढीचे प्रमुख चालक असतील.

दीर्घावधीमध्ये बँकिंग क्षेत्रातील प्रगती, ध्रुवीकरण; तसेच व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता आदींचा विचार करता एचडीएफसी बँकेच्या शेअरचा बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com