
सरकारच्या नव्या GST सुधारामुळे गाड्या व दुचाकींच्या किमती 1.4 लाखांपर्यंत कमी होण्याची शक्यता.
छोट्या कारवर जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी होण्याची शक्यता, तर मोठ्या वाहनांवर 50% वरून 40% पर्यंत घट अपेक्षित.
या निर्णयामुळे ऑटो सेक्टरमध्ये 5–10% मागणी वाढेल आणि ग्राहकांना EMIमध्ये मोठा दिलासा मिळेल.
GST Rate Cut: सणासुदीच्या काळात सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधाराच्या नव्या प्रस्तावाला मंत्र्यांच्या गटाने (GoM) मंजुरी दिली असून अंतिम निर्णय सप्टेंबर 3-4 रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.