Shakti Pumps : सोलर पंप बनवणाऱ्या कंपनीला मोठी ऑर्डर, 1 वर्षात 180% परतावा...

शक्ती पंप (Shakti Pumps) या आघाडीच्या सोलर पंप बनवणाऱ्या कंपनीला HAREDA म्हणजेच हरियाणा रिन्यूएबल एनर्जी डिपार्टमेंटकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.
Big order to solar pump company 180 percent return in 1 year
Big order to solar pump company 180 percent return in 1 yearSAkal

Shakti Pumps : शक्ती पंप (Shakti Pumps) या आघाडीच्या सोलर पंप बनवणाऱ्या कंपनीला HAREDA म्हणजेच हरियाणा रिन्यूएबल एनर्जी डिपार्टमेंटकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला कुसुम-3 योजनेअंतर्गत चौथी ऑर्डर मिळाली आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने 1 वर्षात 180 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 1162 रुपयांवर ट्रेड करत आहे.

बीएसई वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, शक्ती पंपला HAREDA कडून 73.32 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला कुसुम-3 योजनेअंतर्गत हरियाणा सरकारकडून ही चौथी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला 2130 सोलर पंप बसवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे, ज्याचे कमिशनिंग 120 दिवसांच्या आत सुरु करायचे आहे.

गेल्या 7 ट्रेडिंग सत्रांपासून हा स्टॉक सतत घसरत आहे. सध्या तो 5 टक्क्यांनी घसरून 1162 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1599 रुपये आहे जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. स्टॉकने हा रेकॉर्ड 2 फेब्रुवारीला केला होता. सध्या हा स्टॉक त्याच्या उच्चांकापासून सुमारे 28% करेक्ट झाला आहे. असे असुनही या शेअरने 1 वर्षात 180 टक्के मजबूत परतावा दिला आहे.

शक्ती पंप कंपनीची स्थापना 1982 मध्ये झाली. पंप उद्योगातील हे एक मोठे नाव आहे. ही कंपनी एनर्जी एफिशिएंट स्टेनलेस स्टील सबमर्सिबल पंप आणि मोटर्स तयार करते. देशांतर्गत सौर पंप बाजारपेठेतील त्यांचा मार्केट शेअर 30% आहे.

या कंपनीने तयार केलेले सौरपंप सौरऊर्जेवर काम करतात. जे खूप स्वस्त आहे आणि कंपनीला पीएम कुसुम योजनेअंतर्गत भरपूर काम मिळत आहे. या पंपांमध्ये इंधन लागत नाही. ऑपरेशनल लाइफही खूप मोठी आहे. हे पंप्स इको फ्रेंडली देखील आहे आणि ऑपरेट करणे आणि देखरेख करणे सोपे आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com