
केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) योजनेअंतर्गत कमी व्याजदरावर घरासाठी कर्ज सुविधा देते.
या योजनेत कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 25 लाख रुपये किंवा 34 महिन्यांच्या बेसिक सॅलरीइतका अॅडव्हान्स मिळू शकतो.
पती-पत्नी दोघे सरकारी सेवेत असतील तर मिळून 50 लाख रुपये पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
HBA Scheme Benefits: जर तुम्ही सरकारी नोकर असाल आणि बँकेकडून घेतलेल्या होम लोनच्या हप्त्यामुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) या विशेष योजनेअंतर्गत आर्थिक मदत देते. या योजनेमुळे कर्मचारी स्वतःचे घर बांधू शकतात, नवीन घर खरेदी करू शकतात किंवा महागड्या व्याजाचे जुने होम लोन कमी व्याजदरावर फेडू शकता.