
जगभरातील बाजार घसरले, अब्जाधीशांच्या संपत्तीत जबरदस्त घट – शेअर मार्केटमधील घसरणीचा फटका थेट टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तींना बसला.
बेजोस-मस्कचे अब्जोंचे नुकसान – जेफ बेझोसची संपत्ती 17.2 अब्ज डॉलरनी कमी झाली, तर इलॉन मस्कने 4.03 अब्ज डॉलर गमावले.
अंबानी फायद्यात, अदानी तोट्यात – मुकेश अंबानी यांची नेटवर्थ वाढली, तर गौतम अदानी यांची संपत्ती 2.14 अब्ज डॉलरने घटली.
Billionaires Networth: जगभरातील शेअर बाजारात घसरणीची लाट पाहायला मिळत आहे आणि त्याचा थेट फटका अब्जाधीशांच्या संपत्तींना बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे टॅरिफ लावण्याचे संकेत दिल्याने जागतिक शेअर बाजारात गोंधळ उडाला. अमेरिकन शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आणि त्याचा परिणाम सोमवारी जपानसह आशियाई बाजारांवरही दिसून आला.