
M.F. Husain Paintings: ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित असलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या 25 दुर्मीळ चित्रांचा अखेर लिलाव होणार आहे. विशेष म्हणजे ही चित्रे 17 वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडली होती. या चित्रांमागे एक मोठा आर्थिक गैरव्यवहार, तब्बल 100 कोटींची ऑर्डर, 235 कोटींचं कर्जप्रकरण आणि सीबीआयची चौकशी अशा गुंतागुंतीच्या घटना जोडलेल्या आहेत.