
BSNL Q3 Results: भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) शुक्रवारी 14 फेब्रुवारी, 2025 रोजी त्यांचे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे (Q3FY25) आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये, कंपनीने 262 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. 17 वर्षांनंतर प्रथमच कंपनीला नफा झाला आहे. या अगोदर बीएसएनएलने 2007 मध्ये नफा कमावला होता.