GYAN in Budget 2024 : निर्मला सीतारमन यांच्या बजेटमध्ये दडलंय PM मोदींचं 'GYAN'; नेमकं काय आहे खास? वाचा

Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकींपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं.
Union Budget 2024
Union Budget 2024esakal

Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकींपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेटमध्ये निर्मला सीतीरमन यांनी अशा गोष्टींचा उल्लेख केला ज्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच एक टर्म कॉइन केली आहे, ती म्हणजे GYAN. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं हे 'ज्ञान' नेमकं आहे काय? जे बजेटच्या रुपात अर्थमंत्र्यांनी आज संसदेत सादर केलं? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटची रुपरेषा अशी आहे की यामध्ये सादर केलेल्या तरतुदीमध्ये बऱ्याचशा गोष्टी राखून ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबी जुलै २०२४ मध्ये सादर केल्या जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. तेव्हा लोकसभेत नवीन सरकार स्थापन केलं जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारमन पुढील बजेट सादर करतील.

Union Budget 2024
Paytm RBI Ban: वॉलेट, फास्ट टॅग्स पोर्ट होतील? आता UPI पेंमेंट करता येणार का? जाणून घ्या सर्व प्रश्नाची उत्तरं

बजेटमध्ये G काय आहे?

निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये G चा अर्थ आहे गरीब. गरीबांसाठी या बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

1. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. यापूर्वी गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधली आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजनेवर खर्च होणारा पैसा ६६ टक्क्यांनी वाढवून ७९०० कोटी रुपये करण्यात आला आहे.

2. गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ८० कोटी कुटुंबांना पुढील एक वर्ष मोफत अन्नधान्य मिळणे सुरू राहील. यासाठी केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

3. सूर्योदय योजनेचा संदर्भ देत अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की, देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवले जातील. या योजनेंतर्गत ज्यांच्या घरात सौर यंत्रणा बसवली आहे त्यांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल.

Union Budget 2024
Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? २७ फेब्रुवारी रोजी आहे मतदान

Y म्हणजे काय?

पंतप्रधानांनी सांगितलेल्या ज्ञानातील दुसरा शब्द वाय असा आहे. वाय (Y) म्हणजे यूथ. निर्मला सीतारामन यांनीही या अर्थसंकल्पात तरुणांसाठी तरतूद केली आहे. या अंतर्गत १ लाख कोटी रुपयांचा निधी उभा केला जात आहे, ज्यामध्ये युवक ५० वर्षांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकतील. स्किल इंडिया, पीएम मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया आणि स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी योजना यासारख्या उर्वरित जुन्या योजना सुरू राहतील.

A चा अर्थ काय

पीएम मोदींच्या 'ज्ञान'मध्ये तिसरा शब्द A आहे, ज्याचा अर्थ अन्नदाता म्हणजेच शेतकरी. निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे. याअंतर्गत किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना अशा जुन्या योजना सुरू राहतील, मात्र या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियानंतर नॅनो डीएपी खताची तरतूद केली आहे.

Union Budget 2024
Interim budget 2024: टेकसॅव्ही तरुणांसाठी सीतारामन यांची महत्वाची घोषणा! 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जासाठी मोठ्या निधीची तरतूद

N मध्ये विशेष का आहे?

पीएम मोदींच्या 'ज्ञान' मधील चौथा आणि शेवटचा शब्द एन आहे, ज्याचा अर्थ नारी असा आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिलांकडे विशेष लक्ष दिले आहे. महिलांबाबत अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 'लखपती दीदी' 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात येणार असून अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाणार आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय सर्व्हाइकल कॅन्सरच्या लसीकरणाला प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल.

अर्थमंत्र्यांनीही त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात नारी शक्तीसाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. उर्वरित अर्थसंकल्पाचा विचार केला तर त्यात विशेष बदल झालेला नाही. रेल्वेच्या संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत तीन नवीन कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. उर्वरित अर्थसंकल्प नवीन सरकार स्थापन झाल्यावर जुलैमध्ये मांडला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com