
Budget 2025 Date And Time: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाईल. गेल्या काही वर्षांपासून या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळीही अर्थसंकल्प त्याच दिवशी मांडला जाण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल.
हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल, ज्यामध्ये 6 वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे.