Byju: बायजूवर 9,000 कोटींच्या हेराफेरीचा आरोप? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Byju: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजू कंपनीची डोकेदुखी वाढली आहे.
Byju's Asked To Pay Rs 9,000 Crore For Violating Foreign Funding Laws
Byju's Asked To Pay Rs 9,000 Crore For Violating Foreign Funding Laws Sakal

Byju: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजू कंपनीची डोकेदुखी वाढली आहे. बायजूचे सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार बायजूने मीडिया रिपोर्ट फेटाळून लावले आहेत. तसेच कंपनीला ईडीकडून अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही असे बायजूने सांगितले आहे.

एप्रिल महिन्यात ईडीने बायजूच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यानंतर कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते की, कंपनीने इतर कोणत्याही स्टार्टअपपेक्षा भारतात जास्त थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आणली आहे. बायजू कंपनी परकीय चलन कायद्याचे पूर्णपणे पालन करते, असेही त्यांनी नमूद केले होते.

रवींद्रन म्हणाले होते की, BYJU's ने इतर कोणत्याही भारतीय स्टार्टअपपेक्षा जास्त FDI भारतात आणले आहे आणि यामुळे 55,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

बायजू आर्थिक संकटात

बायजू आणि कर्जदार जवळपास वर्षभरापासून वादात अडकले आहेत. या काळात कर्ज कराराच्या वाटाघाटींच्या अनेक फेऱ्या अयशस्वी झाल्या. कंपनीने मुदत कर्जावर व्याज न देण्याचा निर्णय घेतला होता.

Byju's Asked To Pay Rs 9,000 Crore For Violating Foreign Funding Laws
सुरत डायमंड बोर्सच्या 135 कार्यालयांचं आज उद्घाटन; 26 हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला जय महाराष्ट्र

एडटेक कंपनी बायजू गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटातून जात आहे. गेल्या वर्षी, जेव्हा सप्टेंबर 2022 मध्ये आर्थिक आकडेवारी जाहीर झाली तेव्हा कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली.

2021 च्या आर्थिक वर्षात Byju चे 4,589 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या डेटावरून समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांचे उत्पन्नही 30 टक्क्यांनी घसरून 2,428 कोटी रुपयांवर आले आहे.

Byju's Asked To Pay Rs 9,000 Crore For Violating Foreign Funding Laws
Amway India: अ‍ॅमवे इंडियाविरोधात ईडीची मोठी कारवाई; काय आहे 4,050 कोटी रुपयांचे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com