Bank Fraud Case: वरुण इंडस्ट्रीजवर FIR दाखल, दोन बँकांची 388 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कंपनीवर आरोप

Varun Industries Bank Fraud Case: कंपनीवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Varun Industries Bank Fraud Case
Varun Industries Bank Fraud CaseSakal

Varun Industries Bank Fraud Case: सीबीआयने बुधवारी सांगितले की, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

TOI च्या वृत्तानुसार, एप्रिल 2023 मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड, वरुण ज्वेल आणि ट्रायमॅक्स डेटा सेंटरच्या दोन कंपन्यांची सीबीआयने चौकशी केली होती.

बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात ही तपासणी करण्यात आली. वरुण ज्वेलने पीएनबीकडून कर्ज घेऊन खात्यात 46 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचे खाते एनपीए झाले.

पीएनबीचे किती नुकसान झाले?

कंपनीचे खाते एनपीए झाल्यानंतर पीएनबीला 63 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने पीएनबीकडून कर्ज घेऊन 8 कोटी रुपये मॉरिशसमधील उपकंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसने 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 29 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

Varun Industries Bank Fraud Case
LIC ची सुपरहिट योजना! सरकारी नोकरी नसली तरी दरमहा मिळणार 16 हजार पेन्शन, अशी करा गुंतवणूक
Varun Industries Bank Fraud Case
PNB Scam: मेहुल चोक्सीच्या पत्नीची जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

ट्रायमॅक्स आयटीवर 190 कोटींचे कर्ज

कंपनीने इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढून घेतले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. अशा परिस्थितीत 2018 मध्ये खाते एनपीए झाले.

ट्रायमॅक्स आयटीने 190 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून निधीचा गैरवापर केला आणि त्याचे खाते 2017 मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. तपासानंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com