
Government Employee: ऐन सणासुदीच्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो. 'इंडिया टूडे'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.