
500 Rupee Notes: अलिकडेच रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांच्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्याचे आदेश दिले होते. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा त्यांची जुनी मागणी पुन्हा केली आहे.
त्यांनी केंद्र सरकारला 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या पावलामुळे भ्रष्टाचार संपेल असा नायडूंचा विश्वास आहे.