
Ratan Tata Legacy: रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान केला आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 3,800 कोटी रुपये आहे, ज्यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्यातील बहुतांश रक्कम 'रतन टाटा एन्डॉवमेंट फाऊंडेशन' आणि 'रतन टाटा एन्डॉमेंट ट्रस्ट' यांना देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम समाजसेवेसाठी वापरली जाईल.