
महाराष्ट्रात चितळे डेअरी हे नाव म्हणजे विश्वास, दर्जा आणि चव यांचे प्रतीक मानले जाते. ८६ वर्षांची अखंड सेवा आणि गुणवत्तेचा वारसा चालवणाऱ्या या संस्थेने आजपासून खास चहासाठी T-Special Milk बाजारात आणले आहे. हे दूध विशेषतः चहाच्या चवीलाच नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास चितळे डेअरीकडून व्यक्त करण्यात आला आहे.