Credit Card: 21 क्रेडिट कार्ड, तरीही कर्ज नाही! उलट कमावतो 55,000 रुपये; नेमकं काय आहे सीक्रेट?

Credit Card Profit: क्रेडिट कार्डमुळे अनेक जण कर्जाच्या जाळ्यात अडकतात, मात्र एका फ्रीलान्सरने तब्बल 21 क्रेडिट कार्डांचा वापर करूनही एक रुपयाचे व्याज भरलेले नाही. उलट दरवर्षी 55,000 रुपायांपर्यंतची बचत आणि कमाई करत आहे.
How This Freelancer Earns ₹55,000 Every Year From Credit Cards

21 Credit Cards, Zero Debt! How This Freelancer Earns ₹55,000 Every Year From Credit Cards

eSakal

Updated on

क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जाचे जाळे, अशी अनेकांची धारणा आहे. पण एका मराठी फ्रीलान्सरने ही धारणा खोटी ठरवत तब्बल 21 क्रेडिट कार्डांचा वापर करूनही एक रुपयाचे व्याज भरले नाही. उलट, क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि विविध ऑफर्सचा स्मार्ट वापर करत तो दरवर्षी 50 ते 55 हजार रुपये कमावत आहे. म्हणजेच दरमहा सुमारे 4 ते 5 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळवत आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रणव सखदेव आणि त्यांची पत्नी रमा यांनी योग्य आर्थिक नियोजनाच्या जोरावर क्रेडिट कार्डला खर्चाचे नव्हे तर बचतीचे साधन बनवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com