

Drought Declared in Maharashtra! How Much Crop Insurance Will Farmers Get?
eSakal
Crop insurance compensation: महाराष्ट्रातील अनेक भागांत कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याच आधारावर आता राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. मात्र, दुष्काळ जाहीर झाला म्हणजे लगेच विम्याचे पैसे लगेच मिळतात, असे नाही. पीक विम्याची भरपाई ठरवताना संबंधित क्षेत्रातील उत्पादन,पीक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पादन आणि नुकसानीचे प्रमाण अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.