Crude Oil Prices Fall
esakal
आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढल्याचं चित्र असतानाही होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचे दर ९० डॉलर, तर अमेरिकेतील डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वात कमी पातळी आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रेंट क्रूडच्या किमतीत २७.१५ टक्के, तर डब्ल्यूटीआयच्या दरात २३.९२ टक्क्यांची घट झाली आहे.