डिव्हिज लॅब (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,६०२)

औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना औषधनिर्मिती करताना ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट (एपीआय) म्हणजेच जैविकदृष्ट्या सक्रिय घटक आवश्यक असतो.
davis laboratories limited
davis laboratories limitedsakal

औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना औषधनिर्मिती करताना ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट (एपीआय) म्हणजेच जैविकदृष्ट्या सक्रिय घटक आवश्यक असतो. डिव्हिज लॅबोरेटरीज ही कंपनी जागतिक अग्रगण्य औषध उत्पादन कंपन्यांसाठी ‘एपीआय’सह इंटरमीडिएट्स आणि न्यूट्रास्युटिकल घटकांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. जेनेरिकमध्ये नेप्रोक्सन, डेक्सट्रोमेथोरफान, गॅबापेंटिन यांसारख्या उत्पादनांमध्ये कंपनीचा बाजारपेठेत मोठा वाटा आहे.

औषधनिर्मिती क्षेत्र हा कठोर नियमन केलेला उद्योग आहे; तसेच या उद्योगात विविध मंजुऱ्या, परवाने, नोंदणी आणि परवानग्या आवश्यक असतात. अमेरिकेच्या जेनेरिक मार्केटमध्ये भारताचा महत्त्वाचा वाटा आहे, यामुळे ‘एपीआय’ व जेनेरिक औषधांचा पुरवठा करणाऱ्या भारतीय औषध कंपन्यांच्या सुविधा आणि इतर नियामक अनुपालनाबाबतीत नियमितपणे पडताळणी केली जाते.

मापदंडानुसार नियमांचे पालन न केल्यास, या कंपन्यांची अनेक वर्षे संशोधन आणि विकास विभागात केलेली गुंतवणूक वाया जाऊ शकते; तसेच निर्मितीसाठी केलेल्या कराराचे नुकसान होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना, आर्थिक कामगिरीबरोबर नियमांचे पालन करत व्यवसायवृद्धी केल्याचा इतिहास तपासणे महत्त्वाचे आहे. ‘डिव्हिज लॅब’सारख्या कंपनीने गुणवत्ता नियंत्रणावर भर देत तुलनात्मकदृष्ट्या नियमांचे पालन करत व्यवसाय केल्याने जागतिक अग्रगण्य औषध कंपन्यांची ती पसंतीची कंपनी आहे.

तिमाही निकालानुसार, कंपनीने ३५८ कोटी रुपये नफा कमविला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील १७०८ कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीचा महसूल सुमारे आठ टक्के वाढून १,८५५ कोटी रुपये झाला आहे.

मागील तीन तिमाही निकालानुसार, एकूण निव्वळ नफा सुमारे १,०५८ कोटी रुपयांवर पोचला आहे. आगामी काळात कंपनीच्या काकीनाडा युनिटद्वारे उत्पादन क्षमतेमध्ये वाढ अपेक्षित आहे. जवळपास कर्जमुक्त असलेल्या या कंपनीने व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर वार्षिक आधारावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी केली आहे. दीर्घावधीसाठी गुंतवणूकदारांनी या कंपनीचा जरूर विचार करावा.

गोल्ड बीज

(शुक्रवारचा बंद भाव : रु. ५५)

एकीकडे शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ नवे उच्चांक गाठत असताना सोन्याचा भावदेखील उच्चांक गाठताना दिसत आहे. एकूण गुंतवणुकीच्या भांडारात (पोर्टफोलिओमध्ये) मर्यादित प्रमाणात धोका स्वीकारून ‘गोल्ड बीज’ मार्फत सोन्यातील गुंतवणूक करणे दीर्घावधीसाठी फायदेशीर ठरू शकेल.

(डिस्क्लेमरः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com