
Delhi High Court on Patanjali: दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पतंजली आयुर्वेद कंपनीविरोधात अंतरिम आदेश जारी करत मोठा निर्णय दिला आहे. या आदेशानुसार, पतंजलीने डाबर च्यवनप्राशविरोधात कोणतीही भ्रामक किंवा नकारात्मक जाहिरात प्रसारित करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश देण्यात आला.