Gold Rate Today: धनत्रयोदशी दिवशी सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Price Today Latest Update 10 November 2023: जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Dhanteras 2023 Gold Silver Price Today Latest Update 10 November
Dhanteras 2023 Gold Silver Price Today Latest Update 10 November Sakal

Gold Silver Price Today Latest Update 10 November 2023:

जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आज सोन्याच्या दुकानात मोठी गर्दी असते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • नाशिक - 60,780 रुपये

  • सोलापूर - 60,750 रुपये

  • मुंबई - 60,750 रुपये

  • पुणे - 60,750 रुपये

  • अमरावती- 60,750 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Dhanteras 2023 Gold Silver Price Today Latest Update 10 November
Share Market Opening: धनत्रयोदशी दिवशी शेअर बाजार उघडताच आपटला; सेन्सेक्स 64,600 च्या जवळ, कोणते शेअर्स घसरले?

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Dhanteras 2023 Gold Silver Price Today Latest Update 10 November
India GDP: सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने भारताचा जीडीपी वाढेल, मूडीजने व्यक्त केला अंदाज

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com