

Gold and Silver Prices Crash on Dhanteras; Check 22K, 24K Gold Rates
esakal
Gold Silver Rate Today: आज धनत्रयोदशीच्या दिवशीच सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने ग्राहक सोन्या-चांदीची खरेदी करतात. आणि त्यातच आज शुक्रवार 6 नोव्हेंबरला सोने आणि चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे दर नेमके किती आहेत जाणून घ्या.