

डिजिटल सोने की फिजिकल सोने
Sakal
Physical Gold and Digital Gold : भारतासारख्या देशात सोने हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही लोक शाश्वत आणि विश्वासहार्य संपत्तीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात. ज्याच्याकडे फिजिकल स्वरूपात सोने आहे त्याची संपत्ती शाश्वत आहे असे समजले जाते. पण, आता सोने हे फक्त फिजिकल स्वरूपात राहिले नाही. मागच्या काही वर्षांपासून डिजिटल सोने ही संकल्पना चर्चेत आहे. सोने खरेदीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाल्याने लोक डिजिटल स्वरूपातही सोने खरेदी करत आहेत.