

Diwali Bank Holiday 2026
sakal
NOVEMBER 2026 BANK HOLIDAY SCHEDULE FOR DIWALI: दिवाळीचा सण म्हटला की खरेदी, फराळ आणि भेटवस्तूंची लगबग सुरू होते. या काळात पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यामुळे बँकिंग सेवांची गरज अनेकांना भासते. मात्र, नोव्हेंबरच्या या आठवड्यात बँक ग्राहकांना सुट्ट्यांचे नियोजन लक्षात ठेवावे लागणार आहे. दिवाळी पाडवा आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये बँका तब्बल तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे असतील तर ती आधीच पूर्ण करणे फायद्याचे ठरेल.