
dmart news
esakal
डीमार्ट म्हणजे दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. पण त्याची कमाई वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जसे-जसे देशात डीमार्ट स्टोअरची संख्या वाढत आहे, तशीच त्यांची कमाईही वाढत आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२५) डीमार्टची मूळ कंपनी, अव्हेन्यू सुपरमार्ट्स, ने उत्तम कामगिरी केली. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र ऑपरेटिंग महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १५.४३ टक्के वाढून १६,२१८.७९ कोटींवर पोहोचला आणि स्टोअर्सची संख्या ४३२ झाली.