
Tax Saving on Donation: तुम्हाला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर वाचवायचा असेल तर तुमच्याकडे अजून काही दिवसांचा वेळ आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, जर तुम्ही कर बचतीसाठी सर्व प्रकारची गुंतवणूक केली असेल, तर कलम 80G तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र यासाठी तुम्हाला सरकारने ठरवलेल्या ट्रस्टला देणगी द्यावी लागेल. कोणत्याही ट्रस्टला दिलेली देणगी कलम 80G अंतर्गत कर कपातीसाठी पात्र नाही.