Jet Airways: ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी ते जेट एअरवेजचे मालक, नरेश गोयल असे अडकले ईडीच्या जाळ्यात

Jet Airways: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केली आहे.
ED arrests Jet Airways founder Naresh Goyal in bank fraud case know the life and business journey
ED arrests Jet Airways founder Naresh Goyal in bank fraud case know the life and business journey sakal

Jet Airways Founder Naresh Goyal Arrested In Bank Fraud Case:

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बँक फसवणूक आणि 583 कोटींची मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. नरेश गोयल यांनी जेट एअरवेजसारखी मोठी विमान कंपनी स्थापन करून तिला वेगळ्या उंचीवर नेले आणि आता ईडीने अटक केल्यानंतर पुन्हा ते जमीनीवर आले आहेत.

जवळपास 25 वर्षानंतर जेट एअरवेज एप्रिल 2019 मध्ये मोठ्या कर्जामुळे बंद झाली. त्यानंतर कंपनीचे मालक नरेश गोयल यांच्यावर विदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा आणि अनेक देशांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.

कॅनरा बँकेशी संबंधित 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. मात्र, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नरेश गोयल यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात.

300 रुपयांच्या नोकरीने सुरुवात

1949 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी पंजाबमधील संगरूर येथे एका दागिन्यांच्या व्यापाऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या नरेश गोयल यांचे बालपण खूप संघर्षात गेले. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, वयाच्या 18 व्या वर्षी, नरेश गोयल यांनी त्यांचे मामा सेठ चरणदास राम लाल यांच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॅशियर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

त्यांना महिन्याला 300 रुपये पगार मिळत असे. इथे त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नरेश गोयल यांनी आंतरराष्ट्रीय विमान व्यवसायात प्रवेश केला.

1969 मध्ये इराकी एअरवेजने नरेश गोयल यांची जनसंपर्क व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. 1971 ते 1974 पर्यंत त्यांनी ALIA, Royal Jordanian Airlines चे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून काम केले.

नरेश गोयल यांनी मिडल ईस्ट एअरलाइन्सच्या (MEA) भारतीय कार्यालयातही काम केले. तिकीट, आरक्षण आणि विक्री यासह प्रवासी व्यवसायातील अनेक महत्त्वाच्या बाबी त्यांनी येथे समजून घेतल्या.

सुरुवातीचा काळ विमान वाहतूक क्षेत्रासाठी कठीण होता. अनेक खासगी विमान कंपन्यांना अडचणी येत होत्या. या काळात, जेट एअरवेजने देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या व्यवसायाचा ठसा उमटवला होता. 2002 हे वर्ष जेट एअरवेजसाठी ऐतिहासिक ठरले. कारण या वर्षी जेट एअरवेजने भारतीय एअरलाइन्सला मागे टाकले.

2005 मध्ये, एअरलाइनने भांडवली बाजारात प्रवेश केला आणि 20 टक्के भागीदारीसह, गोयल यांची एकूण संपत्ती 8,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली. जेट एअरवेजच्या IPO नंतर, फोर्ब्स मासिकाने नरेश गोयल यांना भारतातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांना स्थान दिले.

सन 2006 मध्ये नरेश गोयल यांनी 1,450 कोटी रुपयांमध्ये एअर सहारा विमान कंपनी खरेदी केली. या डीलमध्ये जेट एअरवेजला 27 विमाने आणि 12 टक्के स्टेक आणि काही आंतरराष्ट्रीय मार्ग मिळाले.

ED arrests Jet Airways founder Naresh Goyal in bank fraud case know the life and business journey
Shaktikanta Das: शक्तीकांत दास जगातील 3 सर्वोत्कृष्ट बँकर्सपैकी एक, पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

पण या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या करारानंतर जेट एअरवेजचे वाईट दिवस सुरू झाले. नरेश गोयल यांनी एअर सहाराचे नाव बदलून जेटलाइट असे केले आणि स्वस्त तिकिटांसह ती पूर्ण सेवा विमान कंपनी म्हणून चालवली. येथूनच कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात जेट एअरवेजच्या विस्तारावरही भरपूर पैसा खर्च झाला.

काही काळानंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात बजेट एअरलाइन्सच्या प्रवेशामुळे संपूर्ण व्यवसायाची परिस्थिती बदलत होती. 2004-05 मध्ये बजेट एअरलाइन्सने विमान व्यवसाय कायमचा बदलला. इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या विमान कंपन्यांनी त्यांच्या कमी किंमतीच्या, नो-फ्रिल मॉडेलने संपूर्ण उद्योगाला हादरवून सोडले.

ED arrests Jet Airways founder Naresh Goyal in bank fraud case know the life and business journey
Aditya L1 Budget: सौर मोहिमेसाठी नासाला लागले होते 12 हजार कोटी; भारताच्या 'आदित्य एल-1'चं बजेट किती?

रुपयाची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींचा फटका

2012 मध्ये भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडला जेव्हा इंडिगोने स्थानिक बाजारपेठेतील शेअर्समध्ये जेट एअरवेजला मागे टाकले.

त्याच वेळी रुपयाची घसरण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे विमान कंपन्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या. संकट वाढतच गेले किंगफिशरसारखी विमान कंपनी त्यावेळी दिवाळखोर झाली.

जेट एअरवेजचा हिस्सा विकला

जेटने एकूण 13,000 कर्मचाऱ्यांपैकी 1,900 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. विमान कंपनीच्या या निर्णयामुळे नरेश गोयल यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

नंतर शासनाच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे लागले. 2013 मध्ये, UAE च्या इतिहादने जेट एअरवेजमध्ये 24 टक्के हिस्सा विकत घेतला. पण गोयल यांनी त्यांची 51 टक्के हिस्सेदारी कायम ठेवली.

नोव्हेंबर 2018 मध्ये, जेटचे तिमाही निकाल तिसऱ्यांदा नकारात्मक होते. जेट एअरवेजवर 25 इतर बँकांचे 8,500 कोटी रुपयांचे कर्ज होते. याशिवाय, कंपनीने 23,000 कर्मचारी आणि शेकडो विक्रेत्यांचे 13,000 कोटी रुपये देणे बाकी होते.

नोव्हेंबर 2018 पासून कंपनीला अनेकवेळा नुकसान सहन करावे लागले आहे. 22 नोव्हेंबर 2018 रोजी कंपनीचे स्वतंत्र संचालक रंजन मथाई यांनीही राजीनामा दिला. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळू शकला नाही.

ED arrests Jet Airways founder Naresh Goyal in bank fraud case know the life and business journey
ED Arrested Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

नोव्हेंबर 2022 मध्ये एफआयआर नोंदवला

सीबीआय एफआयआरमध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी कॅनरा बँकेचे अधिकारी, जेट एअरवेजचे नरेश गोयल, अनिता गोयल, गौरांग आनंद शेट्टी आणि अज्ञात लोकांवर गुन्हेगारी कट आणि विश्वासभंगाचा आरोप असल्याचे म्हटले होते.

त्यांच्या फसवणुकीमुळे कॅनरा बँकेला 538.62 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या तक्रारीनंतर ईडीने गोयल यांना दोनदा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तरीही ते हजर झाले नाहीत.

नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ईडीने फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत गोयल यांच्या आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी छापा टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेने नवीन गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत, कॅनरा बँकेने आरोप केला होता की त्यांनी जेट एअरवेजला (जेआयएल) 848.86 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com