
प्रवर्तन निदेशालय (ED) ने मुंबईतील अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंग आणि सार्वजनिक निधी हेराफेरी प्रकरणी छापे टाकले.
2017-19 दरम्यान येस बँकेकडून घेतलेल्या 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाल्याचा संशय, तसेच बँका-गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप.
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)ही अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले होते.
ED Raids Anil Ambani Group Companies: मुंबईत अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांवर प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठा छापा टाकला आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये करण्यात येत असून, अंबानी ग्रुपच्या विविध कार्यालये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शोधमोहीम सुरु आहे.