
Elon Musk on Singapore: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सिंगापूरसह इतर अनेक देश जगाच्या नकाशावरून नामशेष होणार असल्याचे सांगितले आहे. सिंगापूरसह अनेक देश नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टवर कमेंट करताना मस्कने लिहिले की, सिंगापूर आणि इतर अनेक देश संपुष्टात येत आहेत.