
इलॉन मस्क यांच्या xAI कंपनीत माजी इंजिनिअर शूचेन लीवर गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप आहे.
लीने "Grok" चॅटबॉटशी संबंधित माहिती OpenAI ला पुरवल्याचा संशय असून प्रकरण कॅलिफोर्निया न्यायालयात पोहोचले आहे.
Grok हा ChatGPT पेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा कंपनी करते.
Elon Musk xAI: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी xAI मध्ये मोठ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील माजी इंजिनिअर शूचेन ली (Xuechen Li) यानेच ही गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप कंपनीने केला आहे. याप्रकरणी कॅलिफोर्नियातील न्यायालयात मागील आठवड्यात केस दाखल करण्यात आली.