Natural Gas News : नैसर्गिक वायुपुरवठा सक्षम ; ‘कॉन्फिडन्स’चा नॉर्वेच्या बी. डब्ल्यू कंपनीसोबत करार

भारतातील एलपीजी, सीएनजी पुरवठादार अग्रगण्य कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियम आणि नॉर्वेतील एलपीजीचा व्यापार करणारी कंपनी बी. डब्ल्यू. एलपीजी यांच्यात झालेल्या करारामुळे भारतातील नैसर्गिक वायू पुरवठा क्षेत्राचे जाळे आणखीन मजबूत होण्यास मदत होणार आहे.
Natural Gas News
Natural Gas Newssakal

मुंबई : भारतातील एलपीजी, सीएनजी पुरवठादार अग्रगण्य कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियम आणि नॉर्वेतील एलपीजीचा व्यापार करणारी कंपनी बी. डब्ल्यू. एलपीजी यांच्यात झालेल्या करारामुळे भारतातील नैसर्गिक वायू पुरवठा क्षेत्राचे जाळे आणखीन मजबूत होण्यास मदत होणार आहे. या कराराची घोषणा आज कॉन्फिडन्सचे अध्यक्ष नितीन खारा तसेच बी. डब्ल्यूचे उपाध्यक्ष आयव्हर बाटवीक यांनी केली.

कॉन्फिडन्स पेट्रोलियम दरवर्षी ५० लाख सिलिंडरचे उत्पादन करते. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल यांना हे सिलिंडर दिले जातात. कंपनीचे देशात ६८ बॉटलिंग प्लांट असून त्यातून सिलिंडरमध्ये एलपीजी भरून ते देशभरात पाठवले जातात. आता कंपनीतर्फे टाईप फोर प्रकारचे हलके सिलिंडरही तयार केले जात असल्याची माहिती खारा यांनी दिली.

Natural Gas News
Paytm Crisis: पेटीएम क्यूआर कोड, साउंड बॉक्स अन् कार्ड मशीन बद्दल मोठी अपडेट! आरबीआयने दिली माहिती

कॉन्फिडन्स आणि बी.डब्ल्यू. एलपीजीतर्फे जेएनपीटीमध्ये एलपीजी स्टोरेज टर्मिनल निर्माण केले जाईल. त्याची क्षमता ६२ हजार मेट्रिक टन एवढी असेल. सध्या भारताला मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करावे लागते. त्यासाठी या कंपन्यांतर्फे पोरबंदर, मंगलोर, कराईकल, हल्दिया, विशाखापट्टणम येथे बंदरे विकसित केली जातील.

रोजगार निर्मिती

बी. डब्ल्यू. ग्रुपने कॉन्फिडन्स कंपनीमध्ये अडीचशे कोटी रुपये गुंतवले असून व्यवसाय विस्तारानंतर तीन वर्षांत कॉन्फिडन्सला दहा हजार कोटी रुपये महसूल मिळेल. या सहकार्यामुळे पाच हजार छोटे व्यावसायिक निर्माण होतील आणि पन्नास हजार व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असेही कॉन्फिडन्सचे अध्यक्ष नितीन खारा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com