Paytm Crisis: पेटीएम क्यूआर कोड, साउंड बॉक्स अन् कार्ड मशीन बद्दल मोठी अपडेट! आरबीआयने दिली माहिती

नोटाबंदीनंतर पेटीएमला मोठा नफा झाला होता. तसेच पेटीएम ही देशातील QR आणि मोबाईल पेमेंट क्षेत्रातील मोठी कंपनी बनली होती.
Paytm Crisis
Paytm Crisis

Paytm Crisis Latest News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या अडचणीत सापडलेल्या पेटीएमला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कुठल्याही अडचणीशिवाय चालू राहतील असे स्पष्ट केलं आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात आरबीआयने कारवाई केल्यानंतर पेटीएम सर्व्हिसेस बद्दल अनेक अफवा सुरू आहेत. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स (One 97 Communications)ने मर्चंट्सना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपले नोडल अकाउंट एक्सिस बँकेला दिलो आहे. यासाठी एस्क्रो अकाउंट उघडण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार वन ९७ कम्युनिकेशन्सची सब्सिडरी कंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस(PPSL) आधीपासूनच एक्सिस बँकेसोबत काम करत होती.

Paytm Crisis
PM Modi: सत्तेच्या उपभोगासाठी तिसरा कार्यकाळ मागत नाही, आणखी खूप निर्णय घ्यायचेत; पंतप्रधान मोदींचे संकेत

आरबीआयकडून एफएक्यू जारी

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच सांगितले होते की, ते पेमेंट्स बँकेविरोधात केलेल्या कारावाईचा पुनर्विचार करणार नाहीत. तसेच केंद्रीय बँकाने पेटीएम पेमेंट बँकेला डिपॉझिट घेण्यावर बंदी घालण्याची मुदत २९ फेब्रुवारीवरून वाढवून १५ मार्च केली आहे. सोबतच कस्टमर्सना येत असलेल्या अडचणी सोबवण्यासाठी एफएक्यू देखील जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पेटीएमच्या मर्चंट पेमेंट सर्व्हिसेस १५ मार्चनंतर देखील सुरू राहतील असे सांगितले आहे.

Paytm Crisis
Onion Export Ban Lift: मोदी सरकारचा मोठा निर्णय... कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

फिनटेक कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की व्यापाऱ्यांचे QR कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील. व्यापारी सेटलमेंटमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी, ॲक्सिस बँकेशी करार करण्यात आला आहे.

नोटाबंदीनंतर पेटीएमला मोठा नफा झाला होता. तसेच पेटीएम ही देशातील QR आणि मोबाईल पेमेंट क्षेत्रातील मोठी कंपनी बनली होती. कंपनीने करोडो व्यापाऱ्यांसोबत भागीदारी करून डिजिटल पेमेंटचे मोठे नेटवर्क तयार केले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे ग्राहक त्याच्याशी जोडले गेले. पण, पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com