
PF Withdrawal Made Easy: आता भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता ऑनलाइन पीएफ काढताना, तुम्हाला कॅन्सल केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही किंवा कंपनी किंवा नियोक्त्याकडून मंजुरी घ्यावी लागणार नाही.
आता तुम्ही कोणताही चेक किंवा कंपनीच्या मंजुरीशिवाय पीएफमधून पैसे ऑनलाइन काढू शकता. हा बदल सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे आणि आता पैसे काढण्यास उशीर होणार नाही.