

PF Interest Credited! Check If Your EPFO Account Has Received the 8.25% Interest Yet
eSakal
EPFO PF News: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने 15 जुलैपर्यंत अंदाजे 35 कोटी खातेदारांच्या खात्यांमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे PF व्याज जमा केले आहे. यंदा EPFOकडून सर्व PF ठेवींवर खातेदारांच्या खात्यात 8.25% दराने PF व्याज जमा झाले आहे.
अनेक नोकरदारांना त्यांच्या मोबाईल फोनवर व्याज जमा झाल्याचे मेसेज मिळाले. अनेकांना बुधावार 15 जुलैपूर्वी मेसेज मिळाले, तर काहींना 15 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आणि काहींना तर 16 जुलैच्या सकाळीच व्याज जमा झाल्याचा संदेश मिळाला.