
नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याची माहिती आहे. खातेधारकांना बचतीसाठी यामुळे पर्याय निर्माण होणार आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, गृहनिर्माण, विवाह आणि शिक्षण यांसारख्या गरजांसाठी पैसे काढण्याची मर्यादा शिथिल करण्यावर अधिकारी काम करत आहेत.