ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Direct Benefit Transfer : स्वयंचलित लाभ मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ESIC पोर्टलवरून जारी होणे, नियोक्त्याने मासिक विवरणपत्रे सादर करणे आणि विमा क्रमांक व बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
ESIC New Rules 2026: Direct Benefit Transfer for Employees

ESIC New Rules 2026: Direct Benefit Transfer for Employees

esakal

Updated on: 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात 'एम्प्लॉयीज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन' (ESIC) अंतर्गत विमा संरक्षण असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पात्र कर्मचाऱ्यांना आजारपण किंवा प्रसूतीविषयक लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. नवीन नियमांनुसार, आवश्यक अटी पूर्ण झाल्यानंतर लाभाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा कागदपत्रांचा त्रास कमी होणार असून आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

Loading content, please wait...