
Gold Silver Rate Today: बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव कमी झाले होते. अमेरिकन डॉलरच्या तेजीमुळे आणि ट्रेझरी यील्ड वाढल्यामुळे ही घसरण झाली आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा टॅरिफचा रेटा सुरू केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. भारतात रुपया मजबूत झाल्यामुळेही सोने स्वस्त झालं आहे.